मी आरसा बोलतोय... मराठी निबंध / आरस्याचे आत्मकथन मराठी निबंध | Essay On Mi Aarsa Boltoy.... In Marathi / Aarsyache Atmakathan In Marathi |
![]() |
ह्या ब्लॉग बद्दल:-
- या ब्लॉगमध्ये मी मी आरसा बोलतोय... या विषयावर मराठीमध्ये निबंध सादर केला आहे.
- मी हा निबंध स्वतः लिहिला आहे.
- जर आपल्याला हा निबंध आवडत असेल तर कृपया आम्हाला फॉलो करा, आमचा ब्लॉग आपल्या कुटुंबासह आणि मित्रांसह शेयर करा.
मी आरसा बोलतोय... वर निबंध:-
“अगं! अशी घाबरतेस काय? मी तर तुझा नेहमीचा सखा, आरसा! सांग दर्पणा, कशी मी दिसते? असे म्हणत स्वतःला सतत निरखण्याची तुम्हाला सवय असते. माझ्याशिवाय तुमचे पानही हलणार नाही! पूर्वी लोक नद्या, तळी, सरोवरांत स्वतःचे प्रतिबिंब पाहत असत आणि त्यालाच आरसा मानत. आदिम मानव चकचकित धातूपासूनही माझी निर्मिती करत असे. कालांतराने काच बनवण्याच्या प्रक्रियेचा शोध लागल्यावर माझा खऱ्या अर्थाने वापर सुरू झाला. पारदर्शक काचेला एक बाजू बाजूने धातूचा तर लावून अपारदर्शक केले जाते. बहिर्वक्र, अंतर्वक्र अशा माझ्या सर्व प्रकारांच्या दैनंदिन उपयोगामुळे मी तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलो आहे. तुमच्या छोट्याशा पर्समध्ये, कपाटात माझे अस्तित्व असतेच. चार चाकी, सायकल किंवा दुचाकीच्या दोन्ही कानांना मीच असतो, म्हणून तुम्हाला मागच्या गाड्या, माणसे, रस्ते दिसतात. मनोरंजनासाठी असणाऱ्या विविध उद्यानात किंवा जत्रेच्या ठिकाणी विनोदनिर्मितीसाठीही माझा वापर होतो. राजस्थानी चनिया चोळीसारख्या पारंपारिक वेशभूषेची मी शोभा वाढवतो. दुर्बिणी, सूक्ष्मदर्शी माझ्यापासूनच बनतात. खरे सांगू, माणसे स्वतःचे बाह्यरूप सुंदर दिसावे याकरता माझा वापर अधिक करतात. वास्तविक पाहता, मन सुंदर असनंही महत्वाचं असतं. माणसाच्या चेहऱ्यावरील भाव त्याच्या मनाचा आरसा असतो. तुमचे विचार, यावर उमटतात. त्यामुळे तुमचे विचार व मन सुंदर ठेवण्याचा प्रयत्न केलात तर मनाच्या आरशात तुम्ही सुंदरच दिसाल. मी तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलो आहे, याचा मला फारच आनंद आहे: पण माझ्या अस्तित्वाची दखल घेतली जात नाही, याची थोडीशी खंत वाटते. मला लक्ख ठेवण्यासाठी ओल्या कापडाने पुसत जा. कधी मनाला निराश वाटले तरी माझ्यासमोर उभे राहुन माझ्याशी बोल. ‘आपुलाची संवाद आपणासी!’ खूप सकारात्मक ऊर्जा मिळेल तुला. भाषणाची तयारी माझ्यासमोर उभे राहून कर. मी तुला सादरीकरणात सुधारणा सुचवेन. जा पळ लवकर, शाळेत निघायची वेळ झाली.”
1 comment