-->

Marathi Formal Letter | आनंद पुस्तकालय, पुस्तकांच्या मागणीबाबत, पत्रलेखन | Letter Writing In Marathi |

  


ह्या ब्लॉग बद्दल:-

  • प्रश्न:

⦿ प्रश्न: वाचनम् हितकारम्! आनंद पुस्तकालय १०२, विकास नगर, गाळ नं. २, जालना, सवलत दिनांक १ नोव्हें ते १५ नोव्हें दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त खास आकर्षण कोणत्याही पुस्तकावर २०% सवलत वेळ: सकाळी १० ते रात्री ८, सोमवारी बंद
 

मागणी पत्र (औपचारिक):-

दिनांक: १ नोव्हेंबर २०१८ प्रति, श्री. यदुनाथ चाफेकर माननीय व्यवस्थापक, आनंद पुस्तकालय १०२, विकास नगर, गाळ नं. २, जालना. विषय: पुस्तकांच्या मागणीबाबत. महोदय, सर्वप्रथम, आनंद पुस्तकालयाच्या वर्धापनदिनानिमित्त आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! मी कुमारी अ.ब.क. एक रसिक वाचक या नात्याने आपल्या आनंद पुस्तकालयातून माझ्या आवडीची पाच पुस्तके मागवू इच्छिते. पुस्तकांची यादी सोबत जोडत आहे. तरी ही सर्व पुस्तके लवकरात लवकर दिलेल्या पत्त्यावर पोहोचवल्यास आनंद होईल. सोबत बिलही पाठवावे म्हणजे बिलाची रक्कम घरपोच सेवा उपलब्ध झाल्यावर त्वरित देता येईल. आपण या पुस्तकांवर योग्य ती सवलत द्याल असा विश्वास आहे. पुस्तकांची यादी पुढीलप्रमाणे:

क्रं.

पुस्तकाचे नाव

लेखक

प्रती

श्यामची आई

पांडुरंग सदाशिव साने

ययाती

वि.स. खांडेकर

देह झाला चंदनाचा

राजेंद्र खेर

शास्त्रीय मराठी व्याकरण

मोरो केशव दामले

सावित्री

पु, शि. रेगे

कृपया, पुस्तके लवकरात लवकर पाठवावीत हि नम्र विनंती. कळावे, आपली विश्वासू, अ.ब.क. बी-४०१, श्रीगणेश अपार्टमेंट, वझिरानाका, बोरीवली (प.) मुंबई. abc@xyz.com


आपल्याला काही शंका असल्यास किंवा काही निबंध विनंती असल्यास कृपया खाली टिप्पणी(Comment) द्या किंवा थेट संपर्क साधण्यासाठी Contact Us क्लिक करा !

आनंदी शिक्षण ! आनंदी लेखन !