-->

Marathi Formal Letter | बागेतील क्रीडासाहित्य निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे वापरण्यास धोकादायक आहेत त्याबद्दल तक्रार पत्र लिहा | तक्रार पत्र | Letter Writing In Marathi |

  


ह्या ब्लॉग बद्दल:-

  • प्रश्न :
बागेचे सुशोभीकरण- अंधेरीतील के पी पश्चिम विभागातील रामदास मित्र मंडळ उद्यानाचे सुशोभीकरण स्थानिक नगरसेवक निधीतून करण्यात आले. यात विविध फुलझाडे व क्रीडासाहित्य लावण्यात आल्यामुळे बागेचे रूप बदलून गेले आहे. विभागातील नागरिक या नात्याने बागेतील क्रीडासाहित्य निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे वापरण्यास धोकादायक आहेत त्याबद्दल तक्रार पत्र लिहा.


पत्रलेखन:-

दिनांक: ३० सप्टेंबर २०१९ अ.ब.क. के.पी. पश्चिम विभाग, अंधेरी. प्रति, माननीय स्थानिक नगरसेवक, के.पी. पश्चिम विभाग, अंधेरी. विषय : बागेतील क्रीडासाहित्य निकृष्ट दर्जाचे आहे. माननीय महोदय, मी, अ.ब.क. के.पी. पश्चिम विभागातील नागरिक या नात्याने आपणांस कळवू इच्छितो, की आपण रामदास मित्र मंडळ या उद्यानाचे अतिशय सुंदररित्या नूतनीकरण केले आहे, त्याबद्दल आपले आभार. परंतु, बागेतील क्रीडा साहित्य अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत. तुम्ही बसवलेल्या प्रत्येक क्रीडा साहित्यात काही ना काही त्रुटी आहेत. बागेतील झोपाळ्यांची चैन दोन दिवसांत तुटली तसेच घसरगुंडीचा जिना देखील तुटला तसेच इतर क्रीडासाहित्य देखील वापरण्ययुक्त नाही. ह्यामुळे लहान मुलांना धोका निर्माण होऊ शकतो. तरी आपण आमची विनंती समजावी, अशी अशा. एक नागरिक, अ.ब.क के.पी. पश्चिम विभाग, अंधेरी. abc@xyz.com

आपल्याला काही शंका असल्यास किंवा काही निबंध विनंती असल्यास कृपया खाली टिप्पणी(Comment) द्या किंवा थेट संपर्क साधण्यासाठी Contact Us क्लिक करा !

आनंदी शिक्षण ! आनंदी लेखन !