मी पोस्टमन बोलतोय... मराठी निबंध | पोस्टमन चे आत्मकथन मराठी निबंध | Essay On Mi Postman Boltoy.... In Marathi | Postman Che Atmakathan In Marathi | postman essay in marathi
राम राम मंडळी ! कसे आहेत सगळे ? मजेत ना ? काय ?....... काय विचारताय ?...... मी कोण ? बरोबरच ! तुम्ही हल्लीची पिढी मला कसे ओळखाल ? तुमच्या आत्ताच्या फेसबुक व व्हाट्सअँप च्या युगात माझी गरज कशाला तुम्हाला ? मी पोस्टमन. तुमच्या आई वडिलांना, नाहीतर तुमच्या आजी आजोबांना विचारा मी कोण ? तेव्हाच्या काळात माझ्या सायकलीची घंटी ऐकताच लोकं धावत पळत यायची. कोणाच्या बायकोला तिच्या नोकरीसाठी शहरात गेलेल्या नवऱ्याकडून पत्र यायची तर कधी एका वय झालेल्या आईला तिच्या फौजात गेलेल्या मुलाकडून पत्र यायची ! अरे जे प्रेम, माया, करूणा, आपुलकी त्या पत्रांत असायची ना, ते तुमच्या आत्ताच्या एस. एम. एस, फेसबुक, व्हाट्सअँप मध्ये नाही. तेव्हाच्या काळी लोक महिने-महिने पात्राची वाट बघायचे, म्हणून त्यांचं नातं एवढं मजबूत आणि घनिष्ट होतं. तुमची तर आता एकेका मिनिटात ब्रेकअप अन पॅचअप होतात. कसली तुमची नाती ? डोंबल्याची !
माहीत आहे, हे आधुनिक तंत्रज्ञान काळाची गरज आहे, पण मग आपल्या जुन्या परंपरेला, संस्कृतीला विसरून कसा चालेल ? आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सगळ्यांनी करावा व केलाच पाहिजे पण आपल्या परंपरेला कधीच विसरता काम नये !
हल्लीची पिढी मी कोण हे तर सोडा, मी काय करतो ? हे हि माहित नसतं त्यांना ! आजकाल, मला तर भीती वाटत आहे. या आधुनिक जगात, माझा, माझ्या पत्रांचा जिव्हाळा, माया, ममता, प्रेम कालबाह्य झाले तर ? मी हरवत चाललोय का ? मी विरून चाललोय का ?
Post a Comment