गणेश चतुर्थी मराठी निबंध | Ganesh Chaturthi Essay In Marathi | Essay On Ganesh Chaturthi In Marathi | Ganesh Chaturthi In Marathi
ह्या ब्लॉग बद्दल:-
या ब्लॉगमध्ये मी गणेश चतुर्थी या विषयावर मराठीमध्ये निबंध सादर केला आहे. मी हा निबंध स्वतः लिहिला आहे. जर आपल्याला हा निबंध आवडत असेल तर कृपया आम्हाला फॉलो करा, आमचा ब्लॉग आपल्या कुटुंबासह आणि मित्रांसह शेयर करा.
गणेश चतुर्थी वर निबंध:-
'गजानना श्री गणराया आदी वंदू तुज मोरया'. जो दु:ख दूर करतो आणि जगात आनंद पसरवितो. जो त्याच्या भक्तांसोबत नेहमीच असतो. असा हा माझा लाडका बाप्पा गणेश. गणेश सर्व प्राण्यांमध्ये राहतो. तो कणा-कणात आहे, रगा-रगात आहे, रोमा-रोमात आहे. गणेश सर्वत्र आहे. तो त्याच्या भक्तांना मदत करतो. म्हणून आम्ही त्याच्या आराधनेसाठी गणेशोत्सव हा एक खास उत्सव साजरा करतो.
या दिवसांमध्ये, प्रथम गणेश चतुर्थीला, आम्ही कला मूर्तींच्या दुकानातून गणेशाची प्रतिमा म्हणजेच मूर्ती आणण्यास तयार होतो. आम्ही ढोल-ताशे,टाळ, झांज आणि गणेश स्तुतीच्या विविध नार्यांनी जोमात गणेशाच्या आगमनास सज्ज असतो. या सर्व सूरांसह वाजत गाजत गणपतीची मूर्ती हातात घेऊन आमच्या लाडक्या बाप्पांना आमच्या घरी घेऊन जातो. त्यानंतर आम्ही गणेशाच्या मूर्तीला जमिनीवर रांगोळीने सजवलेल्या स्थानी ठेवतो आणि प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात करतो. प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाल्यानंतर आम्ही बाप्पांची मूर्ती सुंदर सजवलेल्या मखरात ठेवतो. मग आम्ही आरतीची सुरुवात करतो.
आम्ही हा उत्सव पाच दिवस किंवा सात दिवस साजरा करतो. हे भारतीय दिनदर्शिकेवर अवलंबून आहे. आम्ही या सणाला नियमितपणे आरती आणि पूजा करतो. मला हा सण खूप आवडतो, कारण या उत्सवात खूप भक्तिमय आणि आनंददायी वातावरण असते. असे भासते कि जणू साक्षात माझे लाडके गणपती बाप्पाच माझ्या घरात आहेत. आणि त्याचबरोबर माझे व बाप्पांचे आवडते, प्राणप्रिय मोदक देखील असतातच की !. ह्या सणात मी माझ्या संपूर्ण कुटुंबाबरोबर अमूल्य आणि माझ्या जीवनातील सर्वात सुखद काळ घालवतो. ह्या उत्सवादरम्यान मी आणि माझे संपूर्ण कुटुंब गणेश भक्तीत अगदी तल्लीन असतात. मी आणि माझे काका आम्ही रोज बाजारात जाऊन बाप्पांसाठी फुलांचा हार बनवण्यासाठी फुले घेऊन येतो. तसेच माझे काका रोज संध्याकाळी गणेशाची विविध गाणी देखील लावत असत. काय सुंदर भजने असतात ती ! प्रथम तुला वंदितो हे माझे आवडते भजन आहे.
शेवटचा दिवस म्हणजे अर्थात गौरी गणपती विसर्जनाचा दिवस. ह्या दिवशी आम्ही सगळे खूप दुःखात असतो. कारण आम्हाला आमच्या लाडक्या बाप्पाला निरोप जो द्यायचा असतो ! त्यादिवशी माझी आजी शेवटचे मोदक करते. ते मी स्वतः माझ्या बाप्पा समोर ठेवतो. ५:०० वाजता आम्ही आमच्या बाप्पाला निरोप देण्यास निघतो. ढोल ताश्याच्या गजरात आम्ही आमच्या बाप्पाला निरोप देतो. ती सळसळणारी समुद्राची लाट माझ्या बाप्पाची वाट पाहत असते. आम्हा सर्वांच्या मुखात त्या वेळी फक्त एकच बोल असतात, "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" असे नारे लावत आम्ही आमच्या बाप्पाला निरोप देतो. आणि पुढच्यावर्षी बाप्पाचे स्वागत करण्याच्या तयारीला लागतो !
खरच, गणेश उत्सव हा एक सण नाही तर ही एक भावना आहे. भावना, जी प्रत्येक गणेश भक्ताच्या मनात असते, प्रत्येक गणेश भक्ताच्या नसानसात असते, रंधरा-रंधरात असते. आणि त्यात असतात एकच बोल,
'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !'
Post a Comment