-->

Marathi Formal And Informal Letter | 'साहित्यसंपदा' अंकात कथा छापून यावी, भावाची कविता प्रकाशित झाल्याबद्दल, पत्रलेखन | Letter Writing In Marathi |

2 minute read

  


ह्या ब्लॉग बद्दल:-

  • प्रश्न:

विनंती पत्र (औपचारिक): 'साहित्यसंपदा' अंकात कथा छापून यावी अशी विनंती करणारे पत्र संपादकांना लिहा

अभिनंदन पत्र (अनौपचारिक): 'साहित्यसंपदा' च्या दिवाळी अंकात तुमच्या लहान भावाची कविता प्रकाशित झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. 

विनंती पत्र (औपचारिक):-

दिनांक: 6 डिसेंबर 2018 प्रति, श्री. अरविंद वाकोले माननीय संपादक, साहित्यसंपदा, समर्थनगर, पुणे. विषय: ‘साहित्यसंपदा’ च्या पुढील अंकात कथा छापून येण्याबाबत. महोदय, सस्नेह नमस्कार,

मी ‘साहित्यसंपदा’ या मासिकाचा नियमित वाचक आहे. आपल्या अंकातील शालेय विद्यार्थ्यांनी लिहिलेले लेख, कविता, कथा, ललित साहित्य यांचा मी चाहता आहे. आपल्या अंकांद्वारे नवोदितांना हक्काचे व्यासपीठ मिळते आणि वाचनसंस्कृतीही वाढते. अशाच नवोदित लेखकांपासून प्रेरणा घेऊन मी एक कथा लिहिली आहे आपल्या पुढील अंकात आपण ही कथा छापावी ही नम्र विनंती. सोबत कथा जोडत आहे. साहित्यसंपदा सारख्या मासिकात कथा छापून आल्यास माझा हुरूप वाढेल हे नक्की. तेव्हा माझ्या कथेचा आवर्जून विचार करावा. या कथेवरील आपला अभिप्राय आपण कळवलात तर मला त्यातून उत्तम मार्गदर्शन मिळेल. पुढील वाटचालीकरता मला नक्कीच त्याचा उपयोग होईल. आपण या कथेचा विचार कराल अशी मला आशा आहे. कळावे, आपला कृपाभिलाषी, कु. तुषार ढोमे, शारदाश्रम वसतिगृह, परिमल पेठ, पाषाण मारुती मंदिराशेजारी, पुणे. abc@xyz.com

अभिनंदन पत्र (अनौपचारिक):-

दिनांक 5 डिसेंबर 2018 प्रिया अर्णव, अनेक शुभाशीर्वाद.

अरु, साहित्यसंपदाच्या दिवाळी अंकात तुझी ‘समर्पण’ कविता पाहिली आणि डोळ्यात आनंदाश्रू तरळले. ‘साहित्यसंपदा’ सारख्या प्रसिद्ध दिवाळी अंकात तुझी पहिलीवहिली कविता प्रकाशित व्हावी, तीही एवढ्या लहान वयात! माझ्यासाठी ही खूपच अभिमानास्पद बाब आहे. अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!

‘समर्पण’ या नावातच सुंदर भावना दडली आहे! कवितेची भावना तू अलगद उलगडून दाखवली आहेस. शब्दांच्या अचूक निवडीमुळे कविता अधिक खुलली आहे. अवांतर वाचनामुळे तुझे शब्द सामर्थ्य वाढले आहे, हे जाणवते

. यापुढेही तुझ्याकडून अशाच वरवर साध्या सोप्या वाटणाऱ्या पण आशयपूर्ण लेखनाची अपेक्षा आहे. तू नक्कीच खूप मोठा लेखक होशील! परमेश्वर तुझ्या प्रतिभेला अधिक चमक देवो, हीच सदिच्छा!

येथे उन्हाळी सुट्टीत घरी येईल तेव्हा तुझ्यासाठी गंमत जाणार आहे. आई-बाबा व चिनू कसे आहेत? आई-बाबांना माझा साष्टांग नमस्कार सांग. कळावे, तुझाच दादा, कु. सतिष रमेश लघाटे, शारदाश्रम वसतिगृह, परिमल पेठ, पाषाण मारुती मंदिराशेजारी, पुणे.


आपल्याला काही शंका असल्यास किंवा काही निबंध विनंती असल्यास कृपया खाली टिप्पणी(Comment) द्या किंवा थेट संपर्क साधण्यासाठी Contact Us क्लिक करा !

आनंदी शिक्षण ! आनंदी लेखन !